Sunday 14 August 2011

- आरसा -

- आरसा -
 ---------
घरात धावपळ करत असता,
एके दिवशी एक आवाज ऐकू आला,
हलकेसे काहीतरी पुटपुटत एक मंद आवाज बोलत होता.
नजर फिरवीत शोध घेतला तर दिसले,
कोपर्यात उभा असलेला आरसा चक्क बोलू लागला होता.
आरश्याजवळ जाताच तो माझ्याकडे पाहून जरा हसला,
एक मिनिट थांबून पुन्हा काहीतरी म्हणाला.
म्हणू लागला रे माणसा तुम्ही रोजच किती मुखवटे घालता, 
खोटे वागत, खोटे हसत किती जणांना फसवत असता.
सकाळ झाली की नवा चेहरा घेऊन माझ्यासमोर उभे राहता,
व परत परत विचारात राहता, "कोण सर्वांत दिसायला श्रेष्ठ आहे आता?"
रोज रोज मलाही खोटे बोलायला लावता,
असे करून तुम्ही मजाही धर्म का भ्रष्ट करता?
माजे काम आहे तुमचा खरा चेहरा दाखवण्याचा,
पण या मुखावात्यामागील चेहरा मी तरी कसे दाखवणार आता?
मुखावात्यामाग्चे चेहरे आता धूसर होत चालले आहेत,
रे माणसा, आता तरी जागा हो! पुढे अजून खूप वाट आहेत.
या खोट्या दुनियेत स्वतःला हरवू नकोस,
आणि माझ्यासमोर आणखी एक मुखवटा परत घालून येऊ नकोस.

लिहिली होती: ३० डिसेंबर २००५

No comments:

Post a Comment